मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रीमंडळ उपसमितीच्या सदस्यपदी प्रा. राम शिंदे यांचा समावेश.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राज्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवरील निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
Loading...

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांवरील कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याची घोषणा मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्या अनुषंगाने महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली होती. 


या समितीमध्ये शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, सहकार मंत्री श्री.सुभाष देशमुख व कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर या सहा मंत्री महोदयांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. 

या समितीमध्ये सातवे सदस्य म्हणून प्रा. राम शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाने दि. 15 नोव्हेंबर 18 रोजी काढला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.