प्रत्येकालाच आमदार होण्याची घाई - सुजित झावरे पाटलांकडून औटी,लंके,कळमकर टार्गेट !!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यात प्रत्येकाला आमदार होण्याची घाई झाली आहे. पण या सर्व घाईत जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. माझ्या भोवती अनेक अडचणी असताना देखील मी त्याकडे दुर्लक्ष करुन जनतेचे कामे करण्यास प्रथम प्राधान्य देत आहे.असे बोलत सुजित झावरे पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 

Loading...
आज कुठलीही सत्ता नसताना कोणतेही पद नसताना तालुक्याच्या विकास कामात भर घालण्याचे काम सातत्याने करीत आहोत. आपण नांदूर पठार येथील ग्रामस्था निवडणूकी पूर्वी दिलेला शब्द मी आज पूर्ण करु शकलो. याचे समाधान मला आहे. असे मत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केले.

नांदूरपठार येथील आग्रेवस्ती सभामंडपाचे भूमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सदर सभामंडपासाठी झावरे यांच्या विशेष प्रयत्नातून पाच लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आले आहे. झावरे यांनी सन २०१७ मध्ये सदर सभामंडपासाठी निधी देणार असल्याचे सांगितले होते. आज सभामंडपासाठी निधी मंजूर केला.

वेळी अभ्युदय बँकेचे मोहन घनदाट, सरपंच अर्जुनराव देशमाने, ग्रा.पं.सदस्य अरुण आग्रे, संतोष आग्रे, सुरेश आग्रे, उत्तम आग्रे, गंगाधर आग्रे, दिनेश आग्रे, गीताराम आग्रे, बाळासाहेब शिरतार, संतोष घनदाट, सतीश पिंपरकर तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.