भाजप केडगाव दहशतमुक्त करून तेथे विकासाची गंगा आणणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव उपनगर दहशतमुक्त करून तेथे विकासाची गंगा वाहण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही, यासाठी केडगावमधील जनतेने महानगरपालिका निवडणुकीत देशाचा व राज्याचा विकास करणाऱ्या भाजपच्या पाठीमागेच उभे रहावे. केडगावमध्येही आता मोठ्या प्रमाणात भाजपचे काम वाढले आहे. 

त्यामुळेच नुकत्याच झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला केडगावमधून भाजपकडून मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली. त्यामुळे केडगावमधील प्रभाग १६ व १७ मधील आठही जागांवर भाजपचे नगरसेवक निवडून येतील, असे प्रतिपादन भाजप शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.