आ.संग्राम जगतापांचे बंधू शहराच्या राजकारणात.


माजी जि.प सदस्य सचिन जगताप मनपा निवडणूक लढविणार ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रभाग 12 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी चालू असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रभाग 12 मधील उमेदवारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवली आहेत.मात्र या प्रभागातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन अरुण जगताप हे उमेदवारी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Loading...

त्यासाठी सचिन जगताप यांनी ग्रामीण मतदार यादीतील नाव कमी करून शहराच्या मतदार यादीत आपले नाव नोंदवून घेतले आहे. यावरून या प्रभागात सचिन जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असे मानले जात आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून प्रभाग 12 मध्ये दिग्गजांना मैदानात उतरविण्याची रणनिती आखली जात असून त्यात ओंकार गिरवलेंचेही नाव होते. मात्र त्यांनी आता भाजपकडे मुलाखत दिली असल्याने माळीवाड्यातील नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------Loading...
Powered by Blogger.