स्व.कैलास गिरवलेंचे चिरंजीव ओंकार गिरवले भाजपात दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आ. अरुण जगताप आणि आ. संग्राम जगताप यांचे विश्र्वासू स्नेही स्व.कैलास गिरवले यांचे चिरंजीव ओंकार (शंभूनाथ) कैलास गिरवले यांनी उमेदवारीसाठी भारतीय जनता पक्षाकडे मुलाखत दिली असून त्यांच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
Loading...

आपल्या राजकीय कारकिर्दीत स्व.कैलास गिरवले यांनी विविध पक्षात काम केले असले तरी ते आ.जगताप यांचे स्नेही आणि विश्र्वासू होते. त्यांचे चिरंजीव ओंकार गिरवले हेही मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या कळपात दिसून येत होते. 

माळीवाडा परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग 12 मधून श्रीमती निर्मला कैलास गिरवले या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढविणार असल्याची अटकळ बांधली जात होती. मात्र ओंकार गिरवले यांनी अचानक भाजपच्या तंबूत दाखल होत महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग 12 साठी मुलाखत दिली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.