तिजोरी रिकामी असल्याने चोरट्यांना हात हलवत परतण्याची वेळ


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी शहरातील मुलनमाथा येथील 'आयडीएफसी' बॅँक फोडुन तिजोरी चोरट्यांनी लंपास करत बाजुला असलेल्या पटांगणात टाकुन दिल्याची घटना घडली. मात्र, तिजोरी रिकामी असल्याने चोरट्यांना हात हलवत परतण्याची वेळ आली. 

शहरातील मुलन माथा येथे 'आयडीएफसी' बॅँकेची शाखा असुन गेली पाच दिवसापासुन बॅँकेला दिवाळी सणानिमित्त सुट्टी होती. सदर घटना हि दि. ८ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर या दरम्यान घडली असुन अज्ञात चोरट्यांनी बँकेचे कुलूप तोडुन आता प्रवेश करत आतील कागदपत्रांची उचकपाचक केली.

बॅँकेत दोन तिजोऱ्या होत्या. यापैकी एक तिजोरी चोरट्यांना उचलण्यात यश आले नाही. तर, दुसरी तिजोरी चोरट्यांनी उचलुन बाजुला असलेल्या पटांगणात नेऊन कटवनीच्या सहाय्याने फोडली. मात्र, त्यात चोरट्यांना काहीही आढळुन आले नाही. रिकामी तिजोरी बाजुला असलेल्या काटवनातील झाडीत फेकुन चोरटे पसार झाले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.