नगर-सोलापूर रोडवर मोटारसायकल पूलाखाली पडून दोघांचा मृत्यु


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने मोटारसायकल पूलाच्या खाली पडली. या अपघातात पिता-पुत्राचा मृत्यु झाला. ही घटना नगर-सोलापूर रोडवरील आंबीलवाडी गावचे शिवारात पुलाजवळ शुक्रवारी (दि.2) घडली.
Loading...

याबाबतची अधिक माहिती अशी की, बाळू सोपान छत्तीसे (वय 40 रा.रूईछत्तीसी) हा त्याचे वडील सोपान लक्ष्मण छत्तीसे (वय 60) यांना त्यांच्या मोटारसायकल (क्र.एमएच 16 बीएफ 9082) वरून सोलापूर-नगर रोडवरून रुईछत्तीशी गावाकडे भरधाव वेगात येत असतांना मोटारसायकलच्या वेगावरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल आंबीलवाडी गावाच्या शिवारातील पूलाखाली पडली. 

या अपघातात सोपान छत्तीसे व बाळू छत्तीसे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. मोटार सायकलचेही नुकसान झाले. याप्रकरणी नगर तालुका पोलिसांनी संतोष छत्तीसे याच्या फिर्यादिवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.