राम शिंदेना विरोध करण्यासाठी कर्जत जामखेडवर अजित पवारांचे लक्ष !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा तिढा जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिनाभरात सोडवण्यात येईल, असे पक्ष निरीक्षक किशोर मासाळ यांनी बुधवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले. राष्ट्रवादीच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृहावर झाली. 

Loading...
धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्याची फसवी घोषणा भाजपने केली आहे. मंत्री राम शिंदे यांच्या विरोधात पक्ष ताकदीने उतरणार आहे. त्यासाठी अजित पवार यांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. आता आठ दिवसाला बैठक घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे, असे मासाळ यांनी सांगितले. 

मासाळ म्हणाले, तालुक्यातील पदाधिकाऱ्यांत अंतर्गत वाद आहेत. ते मिटवण्यासाठी अजित पवार यांनी मला पाठवले आहे. महिनाभरात हा तिढा सोडवण्यात येईल. पक्षात सोळा शाखा असून सर्व शाखांचे पदाधिकारी निवडण्यात येणार आहेत. 

जो पक्षासाठी सक्षमपणे काम करेल, त्याचीच नियुक्ती करण्यात येईल. बूथ कमिटी ते विधानसभा समितीच्या वतीने पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी एकमुखी ठराव घेण्यात येणार आहेत. 

नगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्याचा विचार पालकमंत्री राम शिंदे करत आहेत. यातून धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही भाजपची खेळी आहे. पुन्हा एकदा धर्माच्या नावाखाली जोगवा मागण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. याला आमचा विरोध आहे. नाव देण्यापेक्षा त्यांचे विचार आचरणात आणा, असा टोला त्यांनी राम शिंदे यांना लगावला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.