मनोरुग्ण महिलेच्या पोटातून काढल्या दीड किलोच्या धातूच्या वस्तू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  इंचभर खिळे, नट-बोल्ट, सेफ्टी पिन, यू पिन, हेअर पिन, ब्रेसलेट, सोनसाखळी, मंगळसूत्र, तांब्याची अंगठी आणि बांगडी अशा तब्बल दीड किलोच्या धातूच्या वस्तू एका महिलेच्या पोटातून अहमदाबाद सरकारी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून बाहेर काढल्या आहेत. संगीता (40) असे या महिलेचे नाव असून, त्या मूळच्या शिर्डी येथील आहेत.
Loading...

मनोरुग्ण असणार्‍या संगीता या काही दिवसांपूर्वी येथील शाहरकोट्टा परिसरात फिरताना दिसल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना 31 ऑक्टोबरला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांच्या पोटाचा एक्स-रे काढल्यानंतर त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. संगीता यांच्या पोटात एक लोखंडी तुकडा दिसला; तसेच एक सेफ्टी पिन फुप्फुसातून बाहेर पडताना दिसली. एक पिन त्यांच्या पोटाला जास्त त्रास देत असल्याचे समजले. 

त्यानंतर त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी नितीन परमार यांनी सांगितले. अडीच तास सुरू असलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. 

कारण वैद्यकीय अधिकार्‍यांनी धारदार धातूच्या वस्तू, दागिने आणि अन्य रस्सी आणि झिपर, नाणी यांसारख्या तब्बल दीड किलो वजनाच्या वस्तू बाहरे काढल्या. अक्युफागिया हा एक दुर्मिळ विकार आहे. यामध्ये व्यक्ती धारदार आणि पचन न होणर्‍या वस्तूंचे सेवन करतात. 

साधारणपणे हा विकार मनोरुग्णांमध्ये आढळतो. संगीता यांना हाच विकार झाला होता. दरवर्षी अशा प्रकारचे एक तरी प्रकरण हाताळत असतो, असे डॉ. परमार यांनी स्पष्ट केले. शस्त्रक्रियेसाठी डॉ. लोमेश आणि शशांक यांनीही सहाय्य केल्याचे त्यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.