मनपा निवडणुकीच्या बैठकीलाच विखे - थोरातांची दांडी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये असलेले माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दांडी मारली. 
Loading...

या बैठकीत चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबरोबर भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. या दोन्ही प्रदेशाध्यक्षांनी आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी जवळपास निश्चित असून, येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी अद्याप झाली नसली, तरी दोन्ही पक्ष या निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काही जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे घोडे अडले असून, ती अडचणही दूर करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे व दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये असलेले माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दांडी मारली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.