माजी मंत्री मधुकर पिचड रुग्णालयात दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री मधुकर पिचड  यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दुपारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Loading...

काही दिवसांपूर्वी पिचड यांना थकवा जाणवू लागला. शरीर तापाने फणफणल्याने व छातीत कफ झाल्याने त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले. 

शरद पवार यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन पिचड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्यासमवेत आमदार हेमंत टकले व पांडुरंग वरोरा, प्रदेश सरचिटणीस शिवाजी गर्जे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक सुरेश गडाख, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, राजेंद्र गुंड आदी उपस्थित होते.

या वेळी मधुकर पिचड यांनी शरद पवार यांना 'नगर जिल्ह्याकडे लक्ष द्यावे,' अशी विनंती केली. तुम्ही तब्येतीची काळजी घ्या, आरोग्य सांभाळा, असा सल्ला पवार यांनी त्यांना दिला. काही दिवसांपूर्वी आमदार वैभव पिचड यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. पवार यांनी त्यांच्याही तब्येतीची चौकशी करून पायाला काय केले, अशी विचारणा केली.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.