भरधाव कारच्या धडकेत विद्यार्थी ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी फॅक्टरी येथे अपघातात  बी फार्मसी महाविद्यालयाचा विद्यार्थी ठार झाला. राहुरी फॅक्टरी-श्रीरामपूर राज्यमार्गावर कराळे यांच्या आदिनाथ सर्विस स्टेशन समोर मंगळवारी दुपारी बारा वाजता अपघात घडला.

Loading...

अविनाश भास्कर लबडे (वय २०, जारकारवाडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे. अविनाश बी. फार्मसी च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. श्रीरामपूर च्या दिशेने भरधाव जाणाऱ्या एम. एच. ०४ बी. के. ९९३७ या कार ने महाविद्यालयाकडे दुचाकी नं. एम. एच. १४ डी.पी. १५८४ वरून येत असलेल्या अविनाशला जोरदार धडक दिली. 

घटनास्थळी उपस्थित असलेले देवळाली प्रवराचे नगरसेवक आदिनाथ कराळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अपघात करून पळून जाणाऱ्या कारचा पाठलाग करून, वाहन चालकाला पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, जखमी अविनाशला विळद घाट येथे रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, डोक्याला जबर मार लागल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
----------------------------


अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.