शिवसेनेच्या नाराज नगरसेवकाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक डॉ. सागर बोरुडे हे गुरुवारी (दि. 15) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. डॉ. बोरुडे हे सन 2013 च्या निवडणुकीत प्रभाग क्र. 4 मधून शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. मात्र पक्षातील नेत्यांकडून आणि मनपातील पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडून सातत्याने विकासकामांसह विविध विषयांमध्ये सातत्याने डावलले गेल्याने डॉ. बोरुडे हे गेल्या वर्ष दिड वर्षांपासून नाराज होते. 
Loading...

त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांशी जवळीक साधली. आगामी निवडणुकीसाठी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मागितली असून नव्याने झालेल्या प्रभाग 1 मधून त्यांनी बुधवारी (दि. 14) मुलाखतही दिली आहे. 

डॉ. बोरुडे हे गुरुवारी (दि. 15) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यांना प्रभाग 1 मधून अनुसूचित जमातीमधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.