शेवगाव दरोड्यातील आरोपीस अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यातील मुरमी येथे टाकलेल्या सशस्त्र दरोड्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी जोरादार मोहीम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने पोलिसांचे पथक नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथून जात होते. त्यावेळी पोेलिसांना पाहून पळून जाणऱ्या एकास पोेलिसांनी ताब्यात घेतले असता. तो या दरोड्यातील आरोपी निघाला.
Loading...

शेवगाव तालुक्यातील मुरमी येथे दि.९ रोजी दरोडेखोरांनी लहानू गाडीवान यांच्या घरावर दरोडा टाकला होता. यात चोरट्यानी लहानूू गाडीवान यांच्यावर तलवारीने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून ५० हजार रूपये रोख व ५४ हजारांचे दागिने असा एकूण १ लाख ४ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. 

याप्रकरणी शेवगाव पोेलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अहमदनगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक नगर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चिचोंडी पाटीलबस स्थानक परिसरात गस्त घालत होते. 

यावेळी पोलिसांचे वाहन पाहून येथील एकजण पळून जावू लागला. मात्र या पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेवून त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने आपले नाव सहीर शेकादम चव्हाण वय ३२ वर्षे,रा.चिचोंडी पाटील,ता.नगर असे सांगितले. 

त्याला पोलिसांना पाहून पळून का गेला अशी विचारणा केली असता. त्याने शेवगाव तालुक्यातील मुरमी येथे आपल्यासह खंडू रामभाऊ भोसले,विकास रामभाऊ भोसले,राठोड रामू चव्हाण सर्व रा. बालमटाकळी शिवार ता.शेवगाव,धर्मा रामभाऊ भोसले रा.उमापूर ता.गेवराई.जी.बीड आदींनी मिळून दारोडा टाकल्याची कबूली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी एकूण ६० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.