मोबाईलच्या नादामुळे शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मोबाईल व टीव्हीवरील व्हिडिओ गेम्सच्या नादामुळे शाळकरी मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना महाल परिसरात घडली असून, क्रिश सुनील लुनावत (वय १४, रा. महाल, मुन्शी गल्ली) असे मृत मुलाचे नाव आहे. तो सातव्या वर्गात शिकत होता.
Loading...

क्रिशला मोबाईल व टीव्हीवरील व्हिडिओ गेम्स खेळण्याचा फारच नाद होता. या नादामुळे तो बऱ्याचदा शाळेला बुट्टीसुध्दा मारायचा, असे त्याच्या घराच्या आजुबाजूचे लोक सांगतात. क्रिशकडे त्याच्या आईचा मोबाईल राहत असे. दरम्यान, सोमवारी त्याच्या आईला बाहेरगावी जायचे असल्याने तिने मुलाजवळील मोबाईल काढून घेऊन स्वत:सोबत घेऊन गेली. 

मोबाईल आईने नेल्यामुळे तो निराश झाला. आई बाहेरगावी गेली, तर मोठी बहीण नोकरीवर गेली होती. दरम्यान तो एकटाच घरी होता. यातच त्याने घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याची बहीण रात्री घरी परत आली असता आतून दार बंद दिसले. क्रिशही आतून प्रतिसाद देत नव्हता. यामुळे तिने पाठीमागच्या खिडकीतून हात टाकून दार उघडले असता क्रिश मृतावस्थेत आढळून आला. 

त्याला मोबाईल व टीव्हीवरील जाँय स्टिकने गेम्स खेळण्याचा फार नाद होता. या नादापायी त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. त्याने ही आत्महत्या सिलिंग फॅनला बेडशिटच्या साहाय्याने गळफास लावून केली. आयशा सुनील लुनावत (२३) यांच्या माहितीवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.