भाजप आ.शिवाजी कर्डिलेंच्या तिसऱ्या मुलीची राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारणात एन्ट्री !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमदार शिवाजी कर्डिले यांची एक कन्या कॉंग्रेसच्या माध्यमातून उपमहापौर पदावर पोहोचली, तर दुसरी कन्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेविका झाली. आता त्यांची तिसरी कन्या ज्योती अमोल गाडे ह्या राजकारणात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट होत असून राष्ट्रवादीच्या तिकिटावर त्या महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे.
Loading...

आ.कर्डिले यांच्या कन्या सौ.सुवर्णा संदीप कोतकर यांनी कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. त्यांना उपमहापौर पदावर पोहचविण्यात आ.कर्डिले यांची भूमिका त्यावेळी महत्त्वाची ठरली होती. त्यांची दुसरी कन्या शितल संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत राजकारणात प्रवेश केला. 

दोन भगिनींची राजकीय कारकीर्द दोन वेगवेगळ्या पक्षांतून यशस्वी झाल्यानंतर आ.कर्डिले यांची तिसरी कन्या ज्योती अमोल गाडे महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय उंबरठ्यावर उभ्या आहेत. विशेष म्हणजे वडील भाजपात असले तरी कन्या मात्र राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्या परिवारातील असलेल्या ज्योती गाडे ज्या प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत त्याच प्रभागात प्रा.गाडे यांचे चिरंजीव नगरसेवक योगीराज गाडे शिवसेनेच्या तिकिटावर मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे भाजपचे आ.कर्डिले आपल्या तिसर्‍या कन्येची राजकीय कारकीर्द घडविताना यावेळी कसे फासे टाकतात याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.