मुख्यमंत्री व सर्व्हेनुसारच मिळणार भाजपची उमेदवारी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सांगली व जळगावप्रमाणेच नगर मनपावरही भाजपचाच झेंडा फडकविण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने भाजपकडून मोर्चबांधणी करण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा यांची कोअर कमिटी करण्यात आलेली आहे.
Loading...

अनेकांचे भाजप प्रवेश झाले तर दुसरीकडे भाजपने उमेदवारीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या, असे असले तरी, मुख्यमंत्री व प्रदेश भाजपच्या सर्व्हेनुसारच उमेदवारी दिली जाणार आहे. ‘स्ट्रॉंग’ उमेदवार हा उमेदवारीचा एकमेव निकष राहणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या मुलाखती केवळ फार्स ठरणार आहेत.

दिवाळी सणाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर नगरच्या पदाधिकार्‍यांशी मनपा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. मनपा निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकाच, अशी सूचनाही त्यांनी केली.

पालकमंत्री राम शिंदे, निरीक्षक आ. सुजितसिंह ठाकूर, रघुनाथ कुलकर्णी, खा. दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, अभय आगरकर, सुनील रामदासी, किशोर बोरा आदींच्या कोअर कमिटीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 

दोन दिवस इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. इच्छुकांनी ढोल-ताशांच्या गजरात समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या. मात्र, आता या मुलाखती फार्स ठरू पाहत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश भाजपने मनपा निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. 

दरम्यान, मनपा उमेदवारीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश भाजपने खासगी संस्थेमार्फत स्वतंत्ररित्या सर्व्हे केला आहे. सदर सर्व्हे मुख्यमंत्री व प्रदेश भाजपकडे पोहोच झाला आहे. या सर्व्हेनुसारच भाजपची उमेदवारी दिली जाणार आहे. 
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.