केडगावच्या आठही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येतील !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- केडगाव उपनगर दहशतमुक्त करुन तेथे विकासाची गंगा वाहण्यासाठी भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही, यासाठी केडगांवमधील जनतेने महानगरपालिका निवडणुकीत देशाचा व राज्याचा विकास करणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागेच उभे रहावे. 

Loading...
केडगावमध्येही आता मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे काम वाढले आहे. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला केडगावमधून भाजपाकडून मोठ्या प्रमाणात इच्छूक उमेदवारांची संख्या वाढली आहे. 

केडगाव येथील प्रभाग 16 व 17 मधील आठही जागांवर भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक निवडून येतील, असे नियोजन केले आहे. यासाठी सामाजिक काम करणारे गणेश ननावरे, महेश गुंड, कृष्णा लांडे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे, असे प्रतिपादन भाजपा शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांनी केले.
Loading...

केडगावचे माजी सरपंच प्रभाकर गुंड यांचे चिरंजीव महेश गुंड, गणेश ननावरे, गौरी ननावरे, कृष्णा लांडे, दिपाली भालसिंग यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी खा. गांधी बोलत होते.

खासदार संपर्क कार्यालय येथे झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात खा.दिलीप गांधी यांनी सर्वांना भाजपाचे उपरणे व झेंडा देऊन पक्षात स्वागत केले. यावेळी गटनेते सुवेंद्र गांधी, सरचिटणीस किशोर बोरा, केडगांव मंडल अध्यक्ष शरद ठुबे, जगन्नाथ निंबाळकर, वल्लभ कुसकर, बाळासाहेब सातपुते, मिलिंद भालसिंग, भरत ठुबे, महेश ननावरे, प्रतिक बारसे, शंकर सुळ, गणेश गाडे, अ‍ॅड.महाजन, राजू सातपुते, अजय पवार, संतोष गाडे, गणेश ठुबे, अमोल ठुबे, केदार लाहोटी, सागर कराळे आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.