नगर तालुक्यात ऐन दुष्काळाच्या खाईत स्वाईन फ्लूचा उद्रेक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पुण्यात पसरलेल्या स्वाईन फ्लूने नगर जिल्ह्यातील वाळकी (ता. नगर) परिसरात हाहा:कार उडाला आहे. आत्तापर्यंत दोघांना स्वाईन फ्लूमुळे जीव गमवावा लागला, तर अनेकांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
Loading...

ऐन दुष्काळाच्या खाईत स्वाईन फ्लूचा उद्रेक झाल्याने नागरीकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. नेमके करावे काय? असाच संतापजनक प्रश्न वाळकीकर करु लागले आहे.मागील आठवड्यात मंगला महादेव कासार यांना स्वाईन फ्लूची लागण झाली होती. 

त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात औषधोपचार चालू होते. मंगला कासार या स्वाईन फ्लूच्या वाळकीतील पहिल्या बळी ठरल्या. त्यांच्या निधनामुळे वाळकी परिसरात एकच खळबळ उडून हळहळ व्यक्त झाली.  

कासार यांच्या निधनानंतर स्वाईन फ्लूने दुसरा बळी घेतला. सुर्यभान घुसळे असे स्वाईन फ्लूमुळे मृत्यूमुखी पावलेल्या इसमाचे नाव आहे. घुसळे यांची शरीरयष्टी अतिशय मजबूत व कणखर होती. कुठल्याही प्रकारचे व्यसन त्यांना नव्हते. 

घुसळे यांच्या निधनाने वाळकीकरांना स्वाईन फ्लूने दु:खाचा जबरदस्त धक्का दिला. घुसळे यांच्यावर दि. १३ नोव्हेंबर रोजी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.. स्वाईन फ्लूने दोघांचा तर बळी घेतलाच याशिवाय आणखी तीन ते चार जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये औषधोपचार चालू आहे. 

रुग्णांना प्रथमतः सर्दी, ताप, खोकला अशी साधी लक्षणे दिसू लागतात. त्यानंतर त्याचे व्हायरल निमोनियामध्ये होऊन स्वाईन फ्लू या आजाराची लक्षणे दिसू लागतात. त्या अगोदरच चांगल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केला तर हा आजार बरा होऊ शकतो.


ज्यांना ह्रदय आणि फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे, अशांना जर सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणं असतील तर त्यांनी विशेष काळजी घ्यावी.असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून करण्यात येत आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.