दारूच्या पैशाच्या वादातून झाला संगणक ऑपरेटरचा खून ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी भागातील एका ग्रामपंचायत मध्ये संगणक ऑपरेटर म्हणून काम पहाणार्या प्रकाश वाघमारे याचा खुन त्याच्या मित्रानेच केला असला तरी या खुनाचा मास्टर माईंड प्रकाश बंडु विसपुते हा आहे. याप्रकरणात आतापर्यंत आठ आरोपीपैकी ७ आरोपी अविवाहित असून प्रकाश विसपुते हाच फक्त विवाहित होता. 
Loading...

त्यातील चार आरोपी अल्पवयीन आहेत. चार आरोपींना राहाता न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. इतर चार आरोपींना रिमांड होममध्ये पाठवले आहे. .या घटनेतील मयत प्रकाशचा खुन करणारा विसपुते हा मुख्य आरोपी असून त्याने प्रकाशला दारु पिण्यासाठी हॉटेलात बोलावुन घेतले होते. 

मद्यपान केल्यानंतर बिल भरण्यास विसपुते याने नकार दिला. बिल भरण्यावरून दोघांत वाद झाले. त्यानंतर विसपुते याने मित्रांना बोलावुन घेतले व प्रकाश वाघमारेला दुचाकीवर बसवुन शेती महामंडळाच्या जागेत नेऊन मारहाण केली. त्यानंतर त्याला सोडुन देत आठ जण पसार झाले. 

Loading...
घटनेनंतर अटक केलेल्या आरोपींनी पोलीसांच्या चौकशीत बिल भरण्याच्या वादातूनच मारहाण केल्याची कबुली दिली आहे. सर्व जण गरीब कुटूबांतील असुन त्यांच्यावर या अगोदर कुठलाही गुन्हा दाखल नाही अथवा त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.