दुष्काळग्रस्त गावे साई संस्थानला दिसत नाहीत ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबांच्या झोळीत भक्तांकडून जमा होणारा निधी खिरापतीसारखा वाटताना साई संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावे दिसली नाहीत का? असा सवाल विखे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी केला. 
Loading...

'शासन आपल्या दारी' या उपक्रमातून मंजूर करण्यात आलेल्या रेशनकार्डांचे वितरण करताना ते बोलत होते. साई संस्थानच्या कारभारावर त्यांनी टीका केली. सरकारची मागणी नसतानाही दुष्काळ निवारणासाठी ५० कोटींचा निधी देण्याच्या निर्णयाबाबत डॉ. विखे म्हणाले, निधी द्यायला आमचा विरोध नाही, पण स्थानिक ग्रामस्थांना डावलून हा निधी वाटला जाणार असेल, तर त्याला आमचा विरोध राहील. 

शिर्डी मतदारसंघात पाच वर्षे विविध उपक्रमांतून जनतेच्या संपर्कात विखे कुटुंब असते. इतरांसारखे निवडणुकीपूर्वी येण्याची आमची पध्दत नाही, असे सांगून डॉ. विखे म्हणाले, प्रत्येकाला रेशनकार्ड मिळवून देण्याचा उपक्रम आपण सुरू केला. देशपातळीवर असा उपक्रम राबवणारा मतदारसंघ एकमेव असेल. कोणालाही पैसे न देता हा उपक्रम यशस्वी झाला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Loading...
Powered by Blogger.