रिलायन्स JIO चा धमाका प्लान, १ वर्ष सर्व काही मिळावा फ्री !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सध्या मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा देण्याच्या या युद्धात, सर्व मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकाला सर्वोत्तम आणि ग्राहकाच्या खिशाला कमीत कमी धक्का लागेल, असा प्लान ऑफर करीत आहेत. या स्पर्धेत टेलिकॉम इंडस्ट्रीत अनेक मोठे बदल पाहायला मिळाले, या स्पर्धेत टिकण्यासाठी दोन कंपन्या एकत्र येताना दिसल्या, तर काहींना कंपनीचं शटर बंद केलं. जाणून घ्या प्लानची माहिती, सोप्या शब्दात दिवाळी संपताना का असेना, रिलायन्सने एक धमाकेदार प्लान ठेवला आहे. 
Loading...

या प्लानचा फायदा अजून देखील तुम्हाला घेता येईल. फक्त या प्लान जिओच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कंपनीने या प्लानला जिओ दिवाली धमाका नाव दिलं आहे. यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, जिओ आपल्या यूझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर देखील देणार आहे. अट अशी आहे की वर्षभरासाठी हा प्लान आपण घेतला तर वर्षभराचे पैसे कॅशबॅकमध्ये दिले जाऊ शकतात.

JIO च्या या प्लानची किंमत १६९९ रूपये आहे. प्लानची मुदत १ वर्ष आहे. एका वर्षासाठी जिओ युझर्सला मोफत कॉलिंग आणि फ्री डाटा मिळेल. या प्लानमध्ये युझर्सला दररोज दीड जीबी डाटा देण्यात येईल. यानुसार वर्षभर एकूण 547.5GB डाटा मिळेल.


जिओने आपल्या युझर्सला १०० टक्के कॅशबॅक ऑफर दिली आहे. प्लानवरील कॅशबॅक ऑफर रिलायन्स डिजिटल कूपन्सच्या स्वरूपात मिळणार आहे. हे कूपन्स युझर्स माय जिओ अॅपच्या माध्यमातून वापरू शकतात. हे कूपन आपोआप युझर्सच्या अॅपमध्ये सेव्ह होईल.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.