मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस १५ दिवसांची कैद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायाधीश श्री. एस. आर. नावंदर यांनी आरोपी मंगेश सोनबा ससाने उर्फ मंडल याला दोषी धरून १५ दिवस कैद व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
Loading...

या बाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील मुलगी शाळेला एसटी बस किंवा बस न मिळाल्याने  रस्त्याने पायी जात असताना आरोपी मंगेश सोनबा ससाने उर्फ मंडल आणि दत्तात्रय तबाजी भांडारकर हे तिच्याकडे वाईट नजरेने पहात असे,तसेच तिची छेडछाड करीत, तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत असे. 

याबाबत तीने पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश ससाने,व दत्तात्रय भांडारकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश श्री. एस. आर. नावंदर यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले. 

त्यात पिडीत मुलगी तिचे वडील तसेच तपासी अंमलदार पोलीस उपविभागीय अधिकारी, नगर ग्रामीण विभाग, आनंद भोईटे यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपी पक्षाच्यावतीने राजकीय कारणातून आरोपींना गोवण्यात आले आहे, हा बचाव न्यायालयाने फेटाळून लावला. 

या खटल्यात घेण्यात आलेला साक्ष पुरावा व कागदोपत्री पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मंगेश सोनबा ससाने उर्फ मंडल याला दोषी धरून १५ दिवस कैद व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.