कर्जतमध्ये दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जतच्या प्रांत कार्यालयासमोर दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात एक जण ठार झाला तर दोन जण जखमी झाले. 

Loading...
मंगळवारी दुपारच्या सुमारास कर्जत-बारामती रस्त्यावर प्रांत कार्यालयासमोर हिरो मोटारसायकल (एम.एच.१६ बी.टी.४१९७) व टीव्हीएस मोटारसायकलचा अपघात होऊन दोन्ही मोटारसायकलवरील तीन जण गंभीर झाले. 

यातील गंभीर जखमी कुंडलिक विश्वनाथ निकत (वय ५५ रा. व ता.कर्जत) यांना पुढील उपचारार्थ तातडीने अहमदनगर येथे नेले. मात्र वाटेतच मिरजगाव येथील दवाखान्यात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. 

तर दीपक छगन जाधव (वय-२५), सर्जेराव गांगर्डे (वय-२८ दोघे रा.बहिरोबावाडी ता.कर्जत) हे गंभीर जखमी झाले. या दोघांवर उपचार करण्यास वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते.

जे होते ते टोलवाटोलव करुन पेशंट दुसरीकडे हलवा म्हणून सांगत होते. तसेच रूग्णवाहिका बंद पडलेली आहे. त्यामुळे १०८ रूग्णवाहिका कर्जत किंवा राशीन येथून येईपर्यंत जखमी दवाखान्याच्या दारात थांबून होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.