कांद्याचे बाजारभाव घटले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वांबोरी उपबाजार समितीतील सोमवारच्या बाजारभावाच्या तुलनेत मंगळवारी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढ्यावर कांद्याचे बाजारभाव क्विंटलमागे ३०० रुपयांनी घटले. रविवारपासून कांद्याचे बाजारभाव १४०० ते १८०० रुपये क्विंटलपर्यंत गेल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. 

Loading...
दिवाळीनंतर बाजारभावात तेजी येण्याचे संकेत व्यापारी वर्गाने दिले होते. मात्र, गेल्या ३ दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात चढउतार सुरू अाहे. सोमवारी वांबोरी उपबाजार समितीमध्ये १ नंबर कांद्याला १४०० ते १८०० रुपये क्विंटल भाव मिळाला. 

मंगळवारी राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर १ नंबर कांद्याला १००० ते १५०० रुपये क्विंटल भाव मिळाला. मोंढ्यावर १३ हजार ९०१ क्विंटल कांद्याची आवक झाली. दोन नंबर कांद्याला ५०० ते ९९० रुपये, तीन नंबर कांद्याला १०० ते ४९० रुपये, तर गोल्टी कांद्याला ४०० ते १००० रुपये क्विंटल भाव मिळाला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.