शिवसेनेकडून युतीची चर्चा जाणीवपूर्वक पसरवण्यात येतेय !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसून तरीही गेल्या दोन दिवसांपासून नगर शहरात युतीची चर्चा जाणीवपूर्वक शिवसेनेकडून पसरवण्यात येत आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून शिवसेनेने युतीबाबतचा प्रश्न सोडविला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा मनपाचे प्रभारी आ. सुजितसिंह ठाकुर यांनी दिली. 

Loading...

भाजपच्या इच्छुकांच्या सोमवारी मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, वरिष्ठ पातळीवर युतीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही आणि असल्यास कोणाशी ही चर्चा सुरू आहे हे शिवसेना नेत्यांनी जाहीर करावे. काही दिवसांपासून मतदार व उमेदवारांत संभ्रम निर्माण केला जात असून शिवसेनेने हे थांबवावे. 

शिवसेनेकडून पक्ष सोडणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे ते थांबविण्यासाठी अशा अफवा सेनेकडून पसरवल्या जात असल्याचे ते म्हणाले. भारतीय जनता पक्ष पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असून युतीबाबत शिवसेनेने उमेदवारी जाहीर करून तो प्रश्न निकाली काढला असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

त्याउपरही युतीबाबत चर्चा करणार असाल तर जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीबाबत पुनर्विचार करून सेनेने लवचिक धोरण स्वीकारल्यास विचार केला जाईल असे ठाकूर यांनी सांगितले.. यावेळी खा. गांधी म्हणाले की, भाजपकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची होत असलेली गर्दी आगामी कौल स्पष्ट करत आहेत.असे त्यांनी स्पष्ट केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.