निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राडेबाज होणार तडीपार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  नगर शहराच्या महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. काल पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होत आहे.महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर होणारी ही चौथी निवडणूक आहे. शहराचा सुव्यवस्थित कारभार करणारी संस्था म्हणून महानगरपालिकेकडे पाहिले जाते.
Loading...

दरम्यान महानगरपालिकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. ही निवडणूक आयोगाच्या निर्देशांच्या अंमलबजावणीनुसार पार पडणार असल्याचे सूतोवाच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे. त्यानुसार निवडणुकीस बाधा पोहोचवतील अशा संशयित राडेबाज व्यक्ती प्रशासनाच्या रडारवर आहेत. या व्यक्तींवर तडीपारीची कारवाई करण्यापूर्वी त्यासंदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे.

ही निवडणूक शांततामय तसेच निर्भय वातावरणात निर्दोषपणे संपन्न व्हावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहिता जारी झाली असून तिची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी दिशादिग्दर्शन करीत आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.