बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा जळालेला मृतदेह आढळला


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  लक्ष्मीपूजनापासून भावली खुर्द येथून बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह तब्बल पाच दिवसानंतर नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोकणवाडी शिवारातील एक निर्जन स्थळी मिळून आला. मृतदेहाचा चेहरा, हात, पाय जळालेले असल्याने या इसमाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 

Loading...

इगतपुरी तालुक्यातील भावली खुर्द येथील एकनाथ उमा आगिवले हा दिवाळीच्या लक्ष्मीपूजन सणाच्या दिवशी घरातून बेपत्ता झाला होता. याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. या इसमाच्या शोधासाठी पोलिसांनी आणि नातलगांनी अनेक प्रयत्न केले; मात्र यश आले नव्हते.सोशल मिडियावरही याबाबत आवाहन करण्यात आले होते. 

काल सकाळी नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या कोकणवाडी शिवारात एका निर्जनस्थळी दरीत एका इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याची दुर्गंधी येत असल्याचे गुराख्याच्या लक्षात आले.पोलीस पाटलांमार्फत पोलिसांना कळविण्यात आले. मृतदेहाची पोलिसांनी तपासणी केली असता, चेहरा, हात आणि पाय जळालेले आढळून आले. जवळ मिळून आलेल्या पॅनकार्डच्या आधारे ओळख पटविणे सोपे झाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.