गुरुवारी जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवारांची यादी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहर भाजपने मंगळवारी दुसऱ्या दिवशीही इच्छुकांनी मुलाखतीचे निमित्त साधून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. पक्षाकडे १७ प्रभागांसाठी तब्बल २०७ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे.नगर महापालिकेची सत्ता एकहाती ताब्यात घेण्याचे ध्येय ठेवलेल्या भारतीय जनता पक्षाच्या अंतिम उमेदवारी यादीची उत्सुकता समर्थकांना लागली आहे. 
Loading...

पालकमंत्री राम शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी, प्रदेश सरचिटणीस व नगरचे प्रभारी आमदार सुजितसिंग ठाकूर, निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश भाजप कार्यकारणी सदस्य अॅड. अभय आगरकर, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शहर संघटन सरचिटणीस किशोर बोरा, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी आदींच्या कोअर कमिटीने मागील दोन दिवसांपासून टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात भाजप इच्छुकांशी संवाद साधला. 

अनेकजण ढोल-ताशांच्या गजरात समर्थकांसह मुलाखत स्थळी आले होते. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशीही लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय गजबजून गेले गेले होते. आता भाजपच्या उमेदवारी निश्चितीच्या याद्यांची प्रतीक्षा इच्छुकांना व त्यांच्या पाठीराख्यांना आहे. गुरुवारी अशी पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.