लघुशंकेसाठी गेलेल्या व्यापाऱ्याला मारहाण करून लुटले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी गेलेल्या व्यापाऱ्याला हॉकी स्टीक व लोखंडी दांडक्याने पाचजणांनी मारहाण करुन व्यापाऱ्याचे ६ हजार ३६० रुपये काढुन घेतले. अजय साठे यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. 
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अजय साठे यांचे शेवगाव रस्त्याला स्टेशनरीचे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैल बाजार भरण्याचे मोकळे मैदान आहे. रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास अजय साठे लघुसंकेसाठी गेले होते. 

तेथे संदिप शिवाजी लबडे, पवन मोरे, आकाश चन्ने, आकाश चातुर, शुभम काळे हे पाचजण आले व साठे यांना हॉकी स्टिकने व लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच त्यांच्या खिशातील ६ हजार ३६० रुपयांची रोख रक्कम काढुन घेतली. मारहाणीत अजय साठे जखमी झाले असून, त्यांच्यावर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.