श्रीगोंद्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव परिसरात कुकडी कालव्याच्या पाण्यात दि.९नोव्हेंबर रोजी, दुपारी एका अनोळखी ३० ते ३५ वर्षांच्या इसमाचे प्रेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 


Loading...
सदर मृतदेहाच्या गळ्यात तार बांधलेली असून, त्या तारेला एक दगड बांधलेला होता. त्यामुळे सदर व्यक्तीचा घातपात करण्यात आला की, या व्यक्तीने आत्महत्या केली. याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. सदर घटनेबाबत बेलवंडी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

जलचर प्राण्यांनी या अनोळखी मृतदेहाचा चेहेरा कुरतडलेला असल्यामुळे ओळख पटवण्यात अडचणी येत आहेत. सदर मृतदेहाच्या अंगात निळ्या रंगाचा हाफ टी शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट आढळून आली. दि.११रोजी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.