कमळाचे पीक आम्हीच आणले, आता तणनाशक फवारून काढणार - खा.राजू शेट्टी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्रात ऊस व दुधाचे सर्वाधिक उत्पादन अहमदनगर जिल्ह्यात होते. मात्र दुर्दैवाने इथेच उसाला व दुधाला दर कमी आहे. आमच्या भागात उसाचा दर शेतकरी ठरवतो आणि कारखानदार तो देतात. तुमच्याकडे तर ही लबाड पुढारी मंडळी आहे. कमळाचे पीक आता तणनाशक फवारुन काढुन टाकावे लागेल असे टीकास्त्र स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर सोडले. 


Loading...
पाडळी येथे रविवारी झालेल्या ऊस व दूध परीषदेत शेट्टी यांनी राज्य सरकार व जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर हल्ला चढविला. पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, ऊस परीषदेसाठी पाडळी ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही हे दुर्दैव आहे. आमचं भाषण ऐकायला माणसं अंधारात बसली, ही कोणाची दहशत आहे. आज सभेसाठी जागा दिली नाही हेच लोक उद्या तुमच्या पालखीचे भोई होतील. लोकशाही आहे हे तर मान्य करा.

 भारतीय जनतापक्षाचे कमळाचे हे पीक आम्हीच आणले होते. आता त्यावर तणनाशक फवारुन हे पीक घालविणार अशी प्रतिज्ञा करुनच आम्ही घराच्या बाहेर पडलो आहोत. पहीले पीक घालवायला पंधरा वर्षे लागली आताचे तर अवघे चार वर्षाचे आहे ते घालवूच. 


साखर काखानदारांनी एफआरपी प्रमाणे उसाचा दर शेतकऱ्यांना द्यावा. एफआरपीचे तुकडे केले तर कारखानादारांचे तुकडे करु. दुष्काळ जाहीर केला आणि सवलती काय दिल्या. चारा छावणी नाही, फी माफ नाही, कर्ज माफी नाही, वीजबील माफ नाही मग दुष्काळ जाहीर करुन काय उपयोग आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.