उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवाराने गर्दी केल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर द्विवेदी यांनी काल महापालिकेत निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. 


Loading...
उमेदवारी अर्ज दाखल करताना संबंधित उमेदवाराने गर्दी केल्यास त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार आहे. जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी अशा प्रकारचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिल्या. 

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारा आणि त्यांच्यासमवेत तीन अशा चार लोकांनाच तेथे प्रवेश असेल. या पेक्षा अधिक लोक घेऊऩ गर्दी करणार्‍याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. सर्व अधिकार्‍यांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे ज्या कार्यक्षेत्रासाठी नियुक्ती करण्यात आली आहे, तेथील हद्दीची पूर्ण माहिती करून घ्यावी. 

विहित मुदतीतच नामनिर्देशनपत्र दाखल करून घ्यावेत. नामनिर्देशनपत्र स्वीकारणे आणि त्याची छाननी ही पूर्णतः निवडणूक निर्णय अधिकर्‍यांची जबाबदारी आहे. नामनिर्देशनपत्र ऑनलाईन आणि हार्डकॉपी अशा दोन्ही स्वरूपात स्वीकारण्यात यावेत. ते दाखल करताना काळजीपूर्वक तपासून घ्यावेत. त्या संदर्भातील सर्व कागदपत्र जतन करावीत. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण करावे. 

निवडणूक कामांत टाळाटाळ केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही द्विवेदी यांनी दिला. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.