हेमंत ओगले श्रीरामपुरात विधानसभेचे उमेदवार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मात्र दिवाळीच्या फराळातून विधानसभा निवडणुकीची पेरणी सुरू असल्याचे चित्र श्रीरामपुरात पहायला मिळत आहे. श्रीरामपुरात विधानसभेचे उमेदवार कोण असणार? याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. त्यात काँगेस पक्षाची उमेदवारी आपणासच मिळणार म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव हेमंत ओगले यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.


Loading...
सन 2009 पासून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या हेमंत ओगले यांनी नगरपालिका निवडणुकीनंतर श्रीरामपुरात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर ससाणे यांच्या मदतीने श्रीरामपुरातील संपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे. गणेशोत्सव काळात तर त्यांच्या नावाचे शुभेच्छा फलक शहर व ग्रामीण भागात झळकले. त्यामुळे श्रीरामपुरात काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत चर्चा सुरू झाली. 

रविवारी हेमंत ओगले यांनी श्रीरामपुरात दिवाळीच्या फराळाचा कार्यक्रम एका मंगल कार्यालयात आयोजित केला. या कार्यक्रमाच्या निमंत्रणाच्या पत्रिका छापून ओगले यांनी स्वतः फिरून निमंत्रण दिले. शिवाय सोशल मिडियावर संदेश व स्वतः भ्रमणध्वणीवर पुन्हा आठवण करून दिली. परिणामी या फराळासाठी शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. 

ओगले यांच्या पाठोपाठ आ. कांबळे यांनीही मंगळवारी एका मंगल कार्यालयात फराळाचे आयोजन केले आहे. तसे संदेश सोशल मिडियावर झळकत आहेत. आजच्या या फराळाची तुलना ओगले यांच्या फराळाशी होणार असल्याने आ. कांबळे फराळासाठी किती जमवतात याकडे श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.