सरपंच पतीकडून जिल्हापरिषदेच्या अधिकार्यांनाच दमबाजी.


महिला सरपंचासह पतीचा आत्महत्या करण्याचा इशारा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एका अतिउत्साही सरपंच पतीने थेट जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनाच दमबाजी करण्याचे धाडस केले आहे,महिला सरपंचाला घेऊन येत आत्महत्या करण्याचा या सरपंच पतीने दिलेला इशारा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 


Loading...
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर तालुक्यातील एका गावात महिला सरपंच आहे. या ग्रामपंचायतीत विकासकामांचे टेंडर काढतांना अनियमितता झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. याच प्रकरणावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी मंगळवारी (दि. 13) सुनावणी ठेवली आहे. 

सुनावणीसाठी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व महिला सरपंचाला सुनावणीसाठी बोलाविण्यात आले आहे. सुनावणीच्या आदल्या दिवशीच या महिला सरपंचाच्या पतीने जिल्हा परिषदेत धाव घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भोर यांच्या दालनात येत या सरपंच पतीने भोर यांना सुनावले. 

संबंधित ठेकेदाराची बाजू का घेता? असा सवाल करत मी म्हणतो तसे न झाल्यास उद्या महिला सरपंचासह येत आत्महत्या करतो. सर्वच्या सर्व सदस्यांना जिल्हा परिषदेत येऊन राजीनामे द्यायला सांगतो, असे म्हणत दमबाजी केली. या सरपंच पतीला भोर समजावून सांगत असतांना कुठलेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नसलेल्या या सरपंच पतीने भोर यांच्या दालनातून निघून जाणे पसंत केले. 


----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Loading...
Powered by Blogger.