प्रचाराच्या एकाच वाहनावर दोन वेगवेगळे नंबर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एकाच वाहनावर दोन वेगवेगळे आरटीओ रजिस्ट्रेशन क्रमांक असलेल्या वाहनातून प्रचार केला जात असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी कडक कारवाईची मागणी कॉ. भैरवनाथ वाकळे यांनी केली आहे. 

Loading...
याबाबत दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, शनिवार दि.१० रोजी दुपारी १२:५८ ते ०१:१५ च्या दरम्यान मनपा प्रभाग क्रमांक ६ मधील शिवरत्न जिवबा महाले चौक ( प्रेमदान चौक) येथे विनापरवाना वाहनातील एलईडी व भोंग्यातुन भाजप पक्षाचा प्रचार सुरू होता.

सदर प्रचार वाहनावर दोन वेगवेगळे आरटीओ रजिस्ट्रेशन नंबर पाहुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कॉ.भैरवनाथ वाकळे, कॉ.दिपकराव शिरसाठ, कॉ.रामदास वागस्कर, कॉ.दत्ताभाऊ वडवणीकर, कॉ.विकास गेरंगे, कॉ.तुषार सोनवणे यांनी वाहन चालकाकडे परवानगीची प्रत पाहण्यास मागितली असता परवानगी दि.७ व ८ ची होती.

त्यामुळे लगेच या घटनेचे छायाचित्रण व छायाचित्रे काढुन आचारसंहिता भंगाची तक्रार नोंदविण्यात आली आहे. दोन-दोन आरटीओ रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या बोगस प्रचार वाहनाची चौकशी करून आदर्श आचारसंहिता भंगाची कडक कारवाई करण्याची मागणी वरील कार्यकर्त्यांनी केली आहे..

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.