दुष्काळाबाबत सरकार अद्याप गंभीर नाही - डॉ. सुजय विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दुष्काळाची तीव्रता वाढत असतानाही सरकार त्याबाबत अद्याप गंभीर नाही. केवळ दुष्काळी तालुक्यांची नावे जाहीर करुन सरकार मोकळे झाले. उपाययोजनांच्या बाबतीत स्थानिक पातळीवर प्रशासन टप्प असल्याची टीका पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी केली. 
Loading...

बाभळेश्वर येथे शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत रेशनकार्डांचे वितरण करताना डॉ. विखे बोलत होते.दुष्काळाचे गांभीर्य वाढत असताना सरकार कोणत्याही उपाययोजना जाहीर करण्यास तयार नाही.

 शिर्डीला पंतप्रधान आले तेव्हा दुष्काळ निवारणासाठी मोठे पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती. पण सरकारने कोणतीही मदत दुष्काळग्रस्त गावांना जाहीर केलेली नाही. मदतीबाबतचे कोणतेही आदेश प्रशासकीय स्तरावर दिले नसल्याने प्रशासन ठप्प अाहे, असे डॉ. विखे म्हणाले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.