ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भरधाव ट्रकची मोटारसायकलीला धडक बसून झालेल्या अपघातात श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील सागर भिमाशंकर आसने (३२ वर्षे) या तरूणाचा जागीच मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी ७ वाळुंज (औरंगाबाद) येथील बजाज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर ही घटना घडली. 
Loading...

सागर औरंगाबाद येथील कंपनीत कामाला होता. दिवाळीसाठी तो गावी आला होता. दिवाळी साजरी केल्यावर त्याच्या वडिलांवर मूतखड्याची शस्रक्रिया शिर्डी येथे झाली. उपचार झाल्यानंतर पत्नी सोनाली, मुलगी व मुलाला तेथेच ठेवून सागर शनिवारी रात्रपाळी असल्यामुळे औरंगाबादला जाण्यासाठी निघाला.

तेथे पोहोचण्याआधी बजाज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर त्याच्या मोटारसायकलीला (एमएच १२ ईके ६३४२) पाठीमागून भरधाव येणाऱ्या केए २९ बी ५६१७ या ट्रकची जोराची धडक बसली. सागर गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले, परंतृ उपचारांपूर्वी त्याचा मृत्यू झाला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.