अखेर खासदार दिलीप गांधी आणि अभय आगरकर एकत्र !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शहर भाजपमधील अंतर्गत गटबाजीने नेहमी चर्चेत असलेले विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी व माजी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्यात थेट पत्रकारांसमोरच मनोमीलन झाले आहे.

Loading...
खासदार दिलीप गांधी यांनी अभय आगरकर यांचा सत्कार करत आगरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त 
फुलांचा बुके देऊन शुभेच्छा दिल्या.आणि सर्व चर्चेला विराम देत दोघांनी एकत्र येत मीडियासमोर एकत्र फोटोसेशनही केले.

राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता नसतानाच्या काळापासून शहर भाजपमध्ये गांधी-आगरकर समर्थकांमधील गटबाजी सर्वश्रुत आहे. मागील २०१३च्या मनपा निवडणुकीनंतर २०१४च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपर्यंत हे दोन्ही गट एकत्र काम करीत होते. 

पण विधानसभा निकालापासून त्यांच्यात पडलेली फूट आत्तापर्यंत कायम होती. या दरम्यानच्या पाच वर्षांच्या काळात केडगाव व भिंगार मंडल अध्यक्ष निवडीवरून दोन्ही गटांनी प्रदेश स्तरावर एकमेकांबद्दल तक्रारी केल्या, एकमेकांच्या या मंडल नियुक्त्या रद्द करवून घेताना पुन्हा फेरनियुक्त्यांतून स्वतःची ताकदही दाखवून दिली. 

पण या सुंदोपसुंदीत अखेर गांधींनी बाजी मारल्याने व त्यांनी नियुक्त केलेले भिंगार व केडगावचे मंडलाध्यक्षच प्रदेश भाजपने कायम केल्याने आगरकर गट नाराज आहे. या पार्श्वभूमीवर मनपा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांतील वाद पक्षाला हानीकारक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रदेश सरचिटणीस आमदार सुजित ठाकूर यांनी या दोघांमध्ये मनोमीलन घडवले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.