राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नगरच्या प्राजक्ताला सुवर्णपदक

                          

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेती प्राजक्ता नगरकर (धाडवे) हिने जयपूर येथे झालेल्या प्रौढांच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ज्युदो या खेळात सुवर्णपदक मिळविले. प्राजक्त नगरकर ही भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व अहमदनगर कॉलेजची माजी विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पदके मिळविली आहेत.


Loading...
भारतीय वरिष्ठ ज्युदो संघातही तिची निवड झाली होती. भारतातर्फे तिने आशियाई ज्युदो स्पर्धा तसेच निमंत्रितांची जागतिक कुस्ती स्पर्धा यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. भारताच्या वरिष्ठ गटातून खेळणारी महाराष्ट्रातील ती पहिली व एकमेव आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे.

नगर येथील यंगमेन्स ज्युदो असो.च्या संजय धोपावकर यांच्याकडे तिने शिक्षण घेतले. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर गेली 20 वर्षे प्राजक्ता या क्षेत्रात कार्यरत आहे. भारतीय विद्यापीठात सध्या ती प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. 

आंतरराष्ट्रीय खेळाडू व छत्रपती छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते (पती) योगेश धाडवे यांनीही या स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. प्राजक्ता या शहरातील ख्यातनाम डॉ. अविनाश नगरकर यांची कन्या व भाऊसाहेब सोसायटी हायस्कूलचे दिवंगत मुख्याध्यापक द.धो.नगरकर यांची नात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.