अभिषेक कळमकरांची मनपा निवडणुकीतून एक्झीट,पारनेर विधानसभा लढविण्याची दाट शक्यता.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवार (दि.13) पासून सुरुवात होत असताना माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती हाती आली आहे.त्यांच्या या निर्णयाने आश्चर्य व्यक्त होत आहे.
Loading...

माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी अचानकपणे निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसा निरोपही त्यांनी पक्ष श्रेष्ठींना दिला आहे. कळमकर यांनी उमेदवारी निश्चित होती. पण त्यांनी अचानक असा निर्णय घेतल्याने पक्षावर नवीन उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

दरम्यान माजी महापौर अभिषेक कळमकर मनपा निवडणुकीतून एक्झीट घेत जिल्ह्यात संपर्क वाढविणार आहेत, पारनेर विधानसभा टार्गेट करण्यात येणार असून पारनेर विधानसभा निवडणुक लढविण्याची दाट शक्यता आहे.असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

महिनाभरापूर्वी मुंबईत झालेल्या नगर लोकसभे संदर्भातील मिटिंगमध्ये राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी कळमकर यांना पारनेर विधानसभा मतदारसंघात लक्ष देण्याचे सूचित केले होते,त्यानुसारच कळमकर यांनी मनपा एवजी पारनेर विधानसभा निवडणुकी साठी प्रयत्न केल्याचे बोलले जाते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.