छोट्या पक्षांना एकत्र घेऊन निवडणुका लढवू : ब्रिगेडियर सुधीर सावंत


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 'आप' अहमदनगर वतीने आयोजित मेळाव्यात महानगरपालिका निवडणुकी संदर्भात  ब्रिगेडियर सुधीर सावंत बोलत होते.अहमदनगर येथे पुढील महिन्यात 20 डिसेंम्बर 2018 रोजी निवडणूक आहे. याबाबत पक्षाच्या नगर जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते आणि विविध छोटे पक्ष आप च्या सोबत येण्यास आणि नगर मधील गुंडगिरी नष्ट करण्यास व विकास करण्यास एकजूटीने येत आहेत, असा संकल्प सर्वानी या मेळाव्यात केला.
Loading...

ह्या मेळाव्यासाठी आप चा परवानगी अर्ज स्वीकृती महानगरपालिकेने नाकारला यामागे प्रस्थापित राजकीय नेते कारणीभूत आहे याचा सर्वानी निषेध केला.या मेळाव्याला संबोधित करताना ब्रिगेडियर पुढे म्हणाले की,ज्यांनी कधी विमान बनवलीच नाहीत. त्या अंबानी कंपनी सोबत मोदींनी विमानाचा करार केला.


36 विमान अव्वाच्या सव्वा किमती ला विकत घेण्याचा हा प्रकार भ्रष्टाचार आहे.हे बंद झाले पाहिजे.नगरमध्ये सुद्धा गुंडगिरी भ्रष्टाचार आपल्याला बंद करायचा आहे. त्यासाठी ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही येथे जमलेल्या छोट्या पक्षांना एकत्र घेऊन लढू, अशी घोषणा त्यांनी केली.


या मेळाव्यात  राज्य आप मीडिया विभाग सदस्य मुकुंद किर्दत , श्याम सोनार तसेच उत्तर महाराष्ट्र आप सह संयोजक प्रभाकर वायचळे नगर मधील आप नेते किरण उपकरे ,राजेंद्र कर्डीले सर, धुत सर ,तिलक डुंगरवाल (आप शिर्डी लोकसभा मतदार संघ प्रमुख ) बहुजन क्रांती पक्षाचे नेते सतीश पालवे, एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी चे प्रमुख रेवणनाथ जाधव, प्रा विष्णू बोरकर निस्सारभाई बाटलीवला, दिलीप घुले,अड.जावेद काझी,प्रताप राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.