महिला कुस्तीपटूने राखी सावंतला आपटलं,जखमी झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अभिनेत्री राखी सावंत कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून कायम चर्चेत असते. पण एका महिला कुस्तीपटूने दिलेलं आव्हान तिला महागात पडलंय. रेसलिंग रिंगमध्ये महिला कुस्तीपटूने राखीला धोबी पछाड दिल्याने तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. 

Loading...


पंचकुलातील ताऊदेवी लाल स्टेडियममध्ये ग्रेट खली आयोजित रेसलिंग शोमध्ये राखीला दुखापत झाल्याचं कळतंय. पंचकुलामध्ये सीडब्लूई चॅम्पियनशिप आयोजित करण्यात आली होती. यादरम्यान महिला कुस्तीपटू रोबेलने पंचकुलातील महिलांना कुस्तीचं आव्हान दिलं. 

यावेळी राखी सावंत रेसलिंग रिंगमध्ये नाचत होती. रोबेलने तिथे असलेल्या राखी सावंतलाही कुस्तीचं आव्हान दिलं. राखीने रोबेलचं हे आव्हान स्वीकरालं. त्यानंतर रोबेलने राखीला उचललं आणि जोरात खाली आपटलं. यामुळे राखीला दुखापत झाली. 

राखी किमान ५ ते ८ मिनिटं रिंगमध्ये वेदनेनं कळवळत होती. पण आयोजकांना ही गोष्ट लक्षात आली नाही. मात्र, राखीला दुखापत झाल्याचं कळल्यानंतर लगेचच तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.