शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीसाठी रस्सीखेस !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आतापासून इच्छुकांची जोरदार व्यूहरचना सुरू आहे. खा. सदाशिव लोखंडे आणि माजीमंत्री बबनराव घोलप यांनी पठार भाग काल पिंजून काढला. दोघांनीही जोरदार तयारी सुरू केलेली असतानाच, तीन दिवसांपूर्वी शिर्डी मतदारसंघातील एका नेत्याने ‘मातोश्री’ येथे उध्दव ठाकरेंची उमेदवारीसाठी भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भेट न झाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले. 
Loading...

 2014 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून संधी मिळाली होती. परंतु काही अडचणींमुळे उमेदवारी रद्द झाली होती. आता पुन्हा आगामी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्याच तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी केले.संगमनेर तालुक्यातील साकूर येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता घोलप बोलत होते. यावेळी शिवसैनिकांनी माजी मंत्री बबनराव घोलप यांचा सत्कार केला.


शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे 21 ऑक्टोबर रोजी शिर्डी दोैर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी खा. सदाशिव लोखंडे यांचे कौतुक करून त्यांना पुन्हा लोकसभेत पाठवावे लागेल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर लोखंडे यांनी मतदारसंघात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. काही खास कार्यकर्त्यांशी बोलून त्यांची मते जाणून घेतली होती. अशा पार्श्‍वभूमीवर ‘शिर्डीतून मीच लढणार’ असे वक्तव्य माजीमंत्री बबनराव घोलप यांनी केल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.