अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कर्जत तालुक्यातील कुळधरणहून धालवडीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कुळधरण-धालवडी मार्गावर जंगलाजवळील वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेने राक्षसवाडी बुद्रुक येथील किरण पपण कोपनर (वय 24) यांचा मृत्यू झाला.


Loading...
कोपनर हे दुचाकीवरून राक्षसवाडीकडे जात होते. दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. रूग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना तत्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात आई, वडील, एक बहीण, आजी असा परिवार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.