मनपा निवडणुक प्रक्रियेत डॉ. सुजय विखेंचेच वर्चस्व ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राष्ट्रवादीसोबत महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यासाठी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी 33 जागांची मागणी करावी, असा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांकडे दिला होता. या 33 पैकी 32 जागा हमखास निवडून येणार्‍या असल्याचा दावाही त्यांनी केला होता.
Loading...

राष्ट्रवादीचा चव्हाण यांनाच विरोध आहे. शिवाय त्यांनी सांगितलेल्या जागा मान्य होणे अशक्यच होते. त्यामुळे चव्हाण यांनी आघाडीच्या बोलणीसाठी पाठविलेला निरोप आम्हाला मिळालाच नाही, असे सांगून राष्ट्रवादीने काँग्रेसला धुडकावले होते. 


‘चव्हाण यांना वगळा, तरच आघाडी’ असा पवित्रा राष्ट्रवादीने घेतल्याने काँग्रेसही सावध झाली. युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केल्याने बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत चव्हाण यांचा 33 जागांचा फॉर्म्युला बाजूला पडण्याची शक्यता आहे. 


त्याऐवजी हमखास निवडून येतील, अशा जागांवरच दावा करण्याचे घाटत आहे. अशा 25 ते 27 जागा निश्चित करण्यात आल्या असून, त्यातील 22 जागांपर्यंत तडजोडीची स्पेस ठेवण्यात आली असल्याचे समजते. यावरून महापालिका निवडणुकीवर काँग्रेसमध्ये पूर्णतः डॉ. विखे पाटील यांचेच वर्चस्व राहण्याची शक्यता आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.