भाजप स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिवसेनेने आपल्या ३२ उमेदवारांची यादी जाहीर करून खळबळ उडवून दिल्यानंतर युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे वक्तव्य शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. त्यामुळे युती होणार असल्याचे संकेत मिळत असताना भारतीय जनता पक्ष मात्र स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युती होणार असल्याच्या चर्चेला तुर्तास ब्रेक मिळाला आहे. 
Loading...
दरम्यान आज महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून इच्छुक असणार्‍या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता मुलाखतीस प्रारंभ झाला. मुलाखतीसाठी येणार्‍या इच्छुकांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.

भाजपच्या या रेकॉर्ड ब्रेक मुलाखतींची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुलाखती घेण्यासाठी पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आमदार सुजितसिंह ठाकूर, रघुनाथ कुलकर्णी, अभय आगरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.