स्वरांकित फौंडेशनच्या ‘दीपोत्सव’संगीत मैफिलीने नगरकर मंत्रमुग्ध


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून नगरमध्ये माऊली सभागृहात स्वरांकित फौंडेशनच्या वतीने ‘दीपोत्सव’संगीत मैफिली घेण्यात आली. पार्श्वगायक संतोष कुलट,मंजुश्री ओक यांच्या सुमधुर आवाजातील भावगीत ,भक्तीगीत ,जुनी गाणी व सोबत अतिशय माहितीपूर्ण व रोचक अशा सौ. मंगला खाडिलकर यांच्या निवेदनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले.
Loading...

कार्यक्रमाचा शुभारंभ भजन सम्राट पंडीत बाळासाहेब वैकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी संत नागेबाबा पतसंस्थेचे कडूभाऊ काळे, श्री.संतोष कुलट,मंजुश्री ओक,सौ.मंगला खाडिलकर,डॉ.सुजाता व डॉ.अशोक नरवडे ,ऋषिकेश कुलट व मान्यवर उपस्थित होते.

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी या अभंगाने पार्श्वगायक संतोष कुलट यांनी सुरवात करून मन हा मोगरा,तुझे गीत गाण्यासाठी ,धुंदी कळ्याना,कधी बहर कधी शिशिर,दर्शन दया गुरुदत्ता गीते सादर केली. तर पार्श्वगायिका मंजुश्री ओक यांनी सुंदर ते ध्यान,अवचित परिमळू,रुपेरी वाळूत,असा बेभान हा वारा,हि वाट दूर जाते हि गीते सादर केली.त्यांना राजू जावळकर,रमाकांत परांजपे,सचिन वाघमारे,यश भंडारे,अभिजित भदे,अमोल कनगरे,ऋषिकेश कुलट यांनी साथसंगत केली.

निवेदिका सौ.मंगला खाडिलकर यांनी गाणी व त्यांचा इतिहास या विषयी दिलेली रोचक व अभ्यासपूर्ण माहिती रसिकांना अधिकच आनंद व अनुभूती देवून गेली.संस्कृती संस्कार सांगणारी गजल केव्हा तरी पहाटे,गेल्या ५० वर्षात संदेश व सूर जुना न वाटता श्रावणाचा आजही आनंद देणारे गीत श्रावणात घननिळा बरसला, शब्दातले औचित्य न सांडता साकारलेली लावणी फड संभाळ तुर्याला ग आलाअशा विविध गाण्यांचा आस्वाद घेत दिवाळी पाडवा पहाटे रंगलेला कार्यक्रम तब्बल चार तास चालला.

नरवडे हॉस्पिटल व गोरे आय केअरच्या सहकार्याने ऋषिकेश कुलट यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या बहारदार कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन विणा दिघे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.