पाथर्डीत एकाच रात्री दहा ठिकाणी घरफोड्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातचोंडी (शिराळ) येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री दहा ठिकाणी चोऱ्या केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे मात्र चिचोंडीमध्ये मोठी घबराट निर्माण झाली असून, या चोरीच्या घटनेत सुमारे पस्तीस हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. 

Loading...
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, चिचोंडी येथे शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आठ ठिकाणी चोरी केली. यामध्ये सोमनाथ पालवे यांच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश करत घरातील कपाटाची उचकापाचक करून, पंचवीस हजार रुपये रोख चोरून नेले आहेत. 

तर गोविंद नजन यांच्यादेखील घराचा कडीकोंडा तोडून घरातील रोख आठ हजार रुपयांची रक्कम चोरून नेली. मधुकर पावसे यांच्या घरातील दीड हजार रुपये चोरून नेले आहेत. चंद्रकांत इपरकर, पंडित सराफ, संजय कांबळे, मधुकर पावसे, शहादेव गीते यांच्या घरात व दुकानात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. 

कैलास आव्हाड यांच्या मेडिकलमध्ये तब्बल तिसऱ्यांदा चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिराळ येथील दिलीप गुगळे, अर्जुन गायकवाड, यांच्या किराणा दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. कैलास आव्हाड यांच्या मेडिकलमध्ये चोरी करण्यासाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून, यामध्ये तोंडाला रुमाल बांधलेले सुटाबुटातील पाच तरुण या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसून येत आहेत. 

आव्हाड यांच्या मेडिकलमध्ये काहीच मिळून न आल्याने तेथील कॅटबरी चॉकलेट घेवून चोरटे पसार झाले. चिचोंडी येथे एकाच रात्री आठ ठिकाणी तर शिराळ येथे दोन ठिकाणी चोरी झाली असून, या चोरीच्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत चिचोंडी गावामध्ये ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.