धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात दगडी पाटा घालून निर्घुण खून


 अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर गावात चारित्र्याच्या संशय आल्याने डोक्यात दगडी पाटा घालून पतीने पत्नीचा खून केला आहे.
Loading...

चारित्र्याच्या संशयावरून शांताबाई धांडे या महिलेचा पतीने खून केला. विशेष म्हणजे खून करणारा आरोपी हा पोलिसाचा मुलगा आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी प्रकाश धांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Loading...

प्रकाश हा पत्नी शांताबाई धांडे यांच्यावर चारित्र्याबाबत सतत संशय घेत असे. यातूनच या दोघा पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होता. हाच वाद टोकाला गेल्यानंतर प्रकाश धांडे याने आपल्या पत्नीला संपवलं आहे.

प्रकाश धांडे आणि शांताबाई या दोघांमध्ये पहाटेच्या सुमारास मोठा वाद झाला. त्यानंतर प्रकाशने घरातील दगडी पाटा उचलून पत्नी शांताबाईच्या डोक्यात घातला. यामध्ये शांताबाई या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.